अभिप्राय

त्यांच्याच शब्दांत — कलावैभवचा त्यांच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी काय अर्थ आहे, हे पालक सांगतात.

पालकांचे शब्द

कुटुंबे काय सांगतात


गायत्री व विक्रांत पुरकर GP

गायत्री व विक्रांत पुरकर

एका पालकाचे मनोगत

कलावैभव सेवाभावी संस्था ही केवळ विशेष मुलांसाठीच नव्हे, तर त्यांच्या पालकांसाठीही "कामधेनू" ठरणारी संस्था आहे. संस्थेच्या अनुभवी संचालक व शिक्षकांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. इथे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांतून मुलांबरोबरच पालकांचाही सर्वांगीण विकास होतो. आंतर्गत व बाह्य उपक्रमांमुळे आम्हा पालकांना आमच्या मुलांमधील सुप्त गुण ओळखता येतात. हे सर्व उपक्रम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले जातात. अत्यंत अल्प कालावधीत संस्थेने विशेष मुलांसाठी यशस्वीपणे राबवलेले विविध व्यवसायाभिमुख उपक्रम त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग मोकळा करतात; याचे संपूर्ण श्रेय कलावैभव संस्थेलाच जाते. संस्थेच्या संचालक व शिक्षकांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तीर्ण पारंब्यांचा वटवृक्ष व्हावा, हीच मनःपूर्वक इच्छा.

संध्या व नेहा कुलकर्णी SK

संध्या व नेहा कुलकर्णी

एका पालकाचे मनोगत

नेहा कुलकर्णी गेली तीन वर्षे "कलावैभव सेवाभावी संस्थे"मध्ये येत आहे, आणि इथे यायला ती नेहमीच आनंदी व उत्सुक असते. शिक्षकांच्या अपार संयमामुळे, प्रेमामुळे व मार्गदर्शनामुळे तिच्यात आश्चर्यकारक सकारात्मक बदल घडून आला आहे. इथल्या आपुलकीच्या व आधार देणाऱ्या वातावरणामुळे तिच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास आला आहे. दिव्यांग मुलांची काळजी घेणे हे एक उदात्त कार्य आहे — एक निष्ठापूर्वक सेवा. अमर्याद संयम, अपार प्रेमाचा वर्षाव आणि प्रत्येक मुलाच्या क्षमतेवरील अढळ विश्वास यांच्या बळावर इथले शिक्षक त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झटतात.

समृद्धी व कमल माटे SM

समृद्धी व कमल माटे

एका पालकाचे मनोगत

😊 🌸 कलावैभव सेवाभावी संस्थेचे मनःपूर्वक आभार! 🙏 माझी मुलगी समीक्षा गेले वर्षभर या संस्थेत येत आहे. 💖 तिच्या आत्मविश्वासात, वागणुकीत आणि विविध कलागुणांमध्ये अतिशय सुंदर सकारात्मक बदल घडून आला आहे. 🌟🎨🎵💃 तिला इथे यायला खूप आवडते आणि ती नेहमीच उत्साहाने सहभागी होते. 😊 सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार! 🙏🌷 विशेष मुलांच्या आयुष्यात आनंदाची व प्रगतीची ज्योत अशीच तेवत ठेवा. ✨❤️🌈 धन्यवाद! 🙏😊